अजित पवारांनी अर्थसंकल्पात ‘पुणे मेट्रो लाइन 3’ बद्दल सांगितली महत्त्वाची माहिती

 


पुणे –
शहरात वेगवान वाहतूक निर्मितीसाठी मेट्रो प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. उदघाटनानंतर मेट्रो सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी खुली करण्यात आली आहे. 12 किमी मार्गिकेवर पुणे आणि पिंपरीतील दोन्ही मार्गिकांवर मेट्रोची सेवा नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यानंतर आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी मेट्रोच्या पुढील प्रास्तवित प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे.

पुणे मेट्रो लाइन 3

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कपासून शिवाजीनगरला जोडणाऱ्या “पुणे मेट्रो लाइन 3” प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. या उन्नतमार्ग मेट्रोची लांबी 23 कि.मी. असून प्रकल्पाची एकूण किंमत  8 हजार 313 कोटी रुपये आहे. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट या जोड मार्गिकांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

मेट्रोची क्षमता

सद्यस्थितीला पुणे व पिंपरी चिंचवड येथे मेट्रोचे प्रत्येकी तीन- तीन डब्बे आहेत. यामध्ये एका डब्यात 325 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. एका वेळी तब्बल 975 प्रवासी प्रवास करू शकतात. यामध्ये एक डबा महिलांसाठी राखीव आहे. आतापर्यत एक लाखाहून अधिक प्रवाश्यांनी मेट्रोतून प्रवास केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या