4 वर्षांनंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर, टी-20 सिरीजचं आयोजन


 श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ  आता कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. यानंतर, भारतीय संघ जूनमध्ये थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतेल, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाईल.

मुंबई : श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. यानंतर, भारतीय संघ जूनमध्ये थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतेल, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाईल. टीम इंडियाच्या या वेळापत्रकात आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेचाही समावेश आहे  आणि आता त्याच्या तारखा अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. क्रिकेट आयर्लंडने  भारताविरुद्धच्या T20 मालिकेपासून सुरू होणार्‍या या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

क्रिकेट आयर्लंडने 1 मार्च रोजी (मंगळवारी) त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरबद्दल माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघ आयर्लंडचा दौरा करणार आहे. यादरम्यान भारतीय संघ दोन टी-20 सामने खेळणार आहे. हे दोन्ही सामने 26 आणि 28 जून रोजी मॅलाहाइड येथे होणार आहेत. भारतीय संघ 4 वर्षांनंतर आयर्लंडचा दौरा करणार आहे. याआधी 2018 मध्येही भारतीय संघाने टी-20 मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला होता आणि मॅलाहाइडमध्येच सामने खेळवण्यात आले होते.

भारत राखीव संघ पाठवणार?

या मालिकेपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे, ज्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. हे सामने 9 जून ते 15 जून दरम्यान खेळवले जातील. मात्र, या मालिकेसाठी टीम इंडिया आपला मुख्य संघ पाठवणार की आपल्या राखीव खेळाडूंचा संघ तयार करून पाठवणार हे अद्याप ठरलेले नाही. कारण आयपीएल 2022 च्या सीझननंतर पुन्हा एकदा भारतीय खेळाडू थेट टी-20 मालिकेत सहभागी होणार आहेत आणि अशा परिस्थितीत अनेक मोठ्या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यावेळी विश्रांती दिली जाऊ शकते.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या