प्रत्येक महिलेने सक्षम होणे गरजेचे : अनुराधा आदीक

 


नगर-


प्रत्येक महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. स्त्री पुरुष समानता ही अत्यंत गरजेचे असून याची सुरुवात स्वतःच्या घरातूनच केली पाहिजे,जसे प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हणतात तसेच एका यशस्वी स्त्रिच्या पाठीशी नेहमी एका पुरुषाचा आधार असतो असे प्रतिपादन श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधाताई आदिक यांनी  केले.

नगर येथील साईदीप हेल्थ केअर अँड रिसर्च सेंटर ट्रस्टच्यावतीने महिला दिनानिमित्त आरोग्य विषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

 यामध्ये त्वचारोग, दंतरोग, व्यायाम व त्याचे महत्त्व स्नायूंशी संबंधित आजार  स्त्रियांचे आजार याविषयी डॉ. पायल धूत. ,डॉ. सर्वेश रसाळ, डॉ.प्रणाली राठोड,डॉ. वैशाली किरण, डॉ.कस्तुरी कुऱ्हाडे, संगीता धूत, ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा सोमानी ट्रस्टी ज्योती दीपक, शोभा धूत, अंजू कथुरियाडॉ. रजिया निसार ,अनिता झालानि, आढावताई,सौ. वाकळेताई व  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, माझे वडील खासदार गोविंदराव आदिक यांनी आम्हा मुलींना नेहमी मुलाच्या बरोबरीने प्रत्येक बाबतीत सहभागी करून घेतले, त्यामुळे स्त्री पुरुष समानतेचे धडे मला घरातून मिळाले. प्रत्येक स्री ही आपल्या दैनंदिन कामातूनच आपली जबादारी सक्षमपणे सांभाळत असते मात्र तिला समाजात मानसन्मान कमी प्रमाणात मिळत असतो तरी सुद्धा ती कोणतीही तक्रार न करता आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असते. महिलांनी आपली नोकरी, दैनंदिन कामे पार पाडत असताना स्वतः कडे व स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईदीप च्या संचालिका डॉ. संगीता कुलकर्णी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या