ऋद्धिमान साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव समोर आलं, मानहानीची नोटीस पाठवणार


 मुंबई:
भारतीय क्रिकेट संघातील  वरिष्ठ विकेटकीपर ऋद्धिमान साहाला कथितरित्या धमकावणाऱ्या पत्रकाराचंनाव अखेर समोर आलं आहे. शनिवारी पाच मार्चला साहाने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या चौकशी समितीसमोर आपली बाजू मांडली व पत्रकाराचं नाव सांगितलं. त्यानंतर ऋद्धिमान साहाने त्या पत्रकाराची ओळख सार्वजनिक केली नाही. पण रात्री स्वत:च त्या पत्रकाराने आपली ओळख उघड केली. पश्चिम बंगालचे सीनियर पत्रकार आणि युट्यूब शो चालवणारे बोरिया मुजूमदारयांनी स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी ऋद्धिमान साहाने आपलं नाव घेतल्याचं त्यांनी सांगितलं. साहाने आमच्या दोघांमध्ये झालेल्या बोलण्याला चुकीच्या पद्धतीने सादर केलं, असा आरोप बोरिया मुजूमदार यांनी केला आहे. ऋद्धिमान साहाला मानहानीची नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


स्क्रिनशॉट शेअर केले होते

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आल्यानंतर साहाने 19 फेब्रुवारीला एक टि्वट केलं होतं. यात सिनियर पत्रकार धमकावत असल्याचं सहाने म्हटलं होतं. त्याने बोरिया मुजूमदार यांच्यासोबत झालेल्या  चे काही स्क्रिनशॉट शेअर केले होते. साहाने त्यावेळी नाव जाहीर केले नव्हते. साहाने मुलाखतीला नकार देऊन अपमान केल्याचा मजकूर त्या स्क्रिनशॉट मध्ये होता. ते पत्रकार बोरिया मुजूमदार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. अखेर काल ते नाव उघड झालं.


साहाने खळबळजनक गौप्यस्फोट केला होता

श्रीलंका सीरीजसाठी काल संघनिवड जाहीर झाल्यानंतर ऋद्धिमान साहाने खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. त्याला सुद्धा संघातून वगळण्यात आलं आहे. “इथून पुढे संघनिवडीसाठी तुझा विचार होणार नाही. त्यामुळे तू आता निवृत्तीचा विचार कर” असं हेड कोच राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने आपल्याला सांगितलं, असा दावा ऋद्धिमान साहाने केला होता.


काय होता तो मेसेज

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या संदर्भातही ऋद्धिमान साहाने वक्तव्य केलं होतं. कानपूर कसोटीत मी न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 61 धावांची खेळी केली. त्यावेळी सौरव गांगुली यांच्याकडून मला एक व्हॉट्स अॅप मेसेज आला होता. त्यामध्ये ‘जो पर्यंत मी BCCI मध्ये आहे, तो पर्यंत तू संघामध्ये राहशील’ असं लिहिलं होतं. सौरव गांगुलीकडून आलेल्या त्या मेसेजने माझा आत्मविश्वास वाढवला. पण आता अचानक सर्वकाही बदललं आहे, असं ऋद्धिमान साहाने सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या