Breaking News

नवी मुंबईत कामगाराकडून ठेकेदाराची निर्घृण हत्या

 नवी मुंबईत तुर्भे एमआयडीसी मधील शिशा साई प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. जयशंकर प्रसाद याने ठेकेदार नंदकिशोर सहाणी याची पैशांच्या वादातून हत्या केली. ठेकेदाराच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हरने वार करुन त्याचा जीव घेतला.

नवी मुंबई : पैशांच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उधारीचे पैसे परत न दिल्यामुळे आरोपीने ठेकेदाराचा खून केला. नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पाठीत स्क्रू ड्रायव्हरने  वार करुन ही हत्या करण्यात आली. मयत तरुणाने आरोपीकडून 30 हजार रुपये उसने घेतले होते, मात्र ते परत न केल्याच्या रागातून ही हत्या केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नवी मुंबईत तुर्भे एमआयडीसी मधील शिशा साई प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. जयशंकर प्रसाद याने ठेकेदार नंदकिशोर सहाणी याची पैशांच्या वादातून हत्या केली. ठेकेदाराच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हरने वार करुन त्याचा जीव घेतला.

गेल्या वर्षभरापासून जयशंकर प्रसाद आणि नंदकिशोर सहाणी हे दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. ठेकेदार नंदकुमारने कामाला असलेल्या जयशंकर प्रसाद याच्याकडून तीस हजार रुपये उधार घेतले होते, मात्र पैसे परत न केल्याचा दावा केला जातो.

स्क्रू ड्रायव्हर पाठीत खुपसला

पैसे चुकते न केल्याच्या रागातून जयशंकर प्रसाद याने ठेकेदार नंदकुमार सहाणीच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला. या हल्ल्यात नंदकुमारचा जागीच मृत्यू झाला आहे.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments