“तुम्हाला शोधून चोप दिला आणि गावात धिंड काढली तर…”, तृप्ती देसाईंनी सुनावले खडे बोल


तृप्ती देसाईंनी याबाबत एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. तृप्ती देसाई या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी घाणेरड्या कमेंट करत ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनवले आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तृप्ती देसाई या पुन्हा एकदा महिलांच्या हक्कासाठी काम करण्यासाठी सरसावल्या आहेत. यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. नुकतंच रबरी लिंगाच्या प्रात्यक्षिकाला तृप्ती देसाईंनी पाठिंबा दर्शवला होता. यामुळे अनेकांना त्यांना ट्रोल केले होते. मात्र नुकतंच तृप्ती देसाईंनी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. तृप्ती देसाईंनी याबाबत एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

तृप्ती देसाईंनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. तसेच अनेकांनी ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान तृप्ती देसाईंची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान तृप्ती देसाई या बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वाच्या स्पर्धक होत्या. काही आठवडे घरात राहिल्यानंतर त्या एलिमिनेट झाल्या. तृप्ती देसाई या तब्बल ५० दिवस बिग बॉसच्या घरात होत्या. यानंतर महेश मांजेरकरांनी ५० दिवसांचा प्रवास कसा वाटला? असा प्रश्न तृप्ती देसाईंना विचारला.

त्यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, “५० दिवस हा फार मोठा प्रवास आहे. पण बिग बॉसच्या घराबद्दल बरेच गैरसमज आहेत. मात्र बिग बॉसचे घर हे फार छान आहे. मी सर्वांची मनं जिंकलंय हे सर्वात मोठं आहे. मी सामाजिक कार्य करते हे मी आधी लोकांना सांगत होते. पण आता लवकरच मी राजकारणात प्रवेश करणार आहे,” असे तृप्ती देसाईंनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या