पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका


 जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात किती आहे दर?

गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.

इंधनाचे दर वाढले असल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०१ रुपये ८१ पैसे झाला आहे. याआधी हा दर १०१ रुपये १ पैसे होता. तर दुसरीकडे डिझेलचा दर प्रतिलीटर ९२ रुपये ७ पैशांवर पोहोचला आहे. याआधी हा दर ९३ रुपये ७ पैसे होता.

मुंबईबद्दल बोलायचं गेल्यास ८० पैशांची वाढ झाल्यानंतर एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी तब्बल ११६ रुपये ७२ पैसे आणि १०० रुपये ९४ पैसे मोजावे लागणार आहेत.

इंधर दरवाढ का? : भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के इंधन परदेशातून आयात करतो. करोनाच्या काळात किमती घसरल्यानंतर जगभरात नोव्हेंबर २०२० पासून तेल आणि गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. २२ मार्च रोजी ५० रुपयांच्या वाढीनंतर भारतात १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत नोव्हेंबर २०२० पासून ६० टक्क्यांनी वाढली आहे. जगातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नियंत्रित करण्यात सौदी अरेबियाचा मोठा वाटा आहे. नोव्हेंबर २०२० पासून सौदी अरेबियाच्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी सौदी अरामकोने गॅसची किंमत ३७६ मेट्रिक टनांवरून ७६९ मेट्रिक टनांपर्यंत वाढवली आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ४१ अमेरिकन डॉलरवरून ११५.४ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तेल आणि गॅसच्या किमती फार काळ नियंत्रणात ठेवणे भारतासारख्या देशाला शक्य नाही.


शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर ११६.६९ ९९.४२

अकोला ११६.९६ ९९.७०

अमरावती ११७.७३ १००.४५

औरंगाबाद ११६.८१ ९९.५३

भंडारा ११७.३८ १००.१०

बीड ११७.५८ १००.२८

बुलढाणा ११७.१८ ९९.९२

चंद्रपूर ११६.७९ ९९.५६

धुळे ११६.४३ ९९.१७

गडचिरोली ११७.६३ १००.३७

गोंदिया ११७.८९ १००.६०

बृहन्मुंबई ११६.७२ १००.९४

हिंगोली ११८.२२ १००.९२

जळगाव ११७.६२ १००.३४

जालना ११८.२१ १००.८७

कोल्हापूर ११७.१९ ९९.९२

लातूर ११७.४९ १००.२०

मुंबई शहर ११६.७२ १००.९४

नागपूर ११६.४० ९९.१७

नांदेड ११९.२३ १०१.८८

नंदुरबार ११७.५६ १००.२६

नाशिक ११७.०७ ९९.७८

उस्मानाबाद ११७.६६ १००.३६

पालघर ११६.७६ ९९.४५

परभणी ११९.७४ १०२.३५

पुणे ११६.५१ ९९.२४

रायगड ११७.४८ १००.१५

रत्नागिरी ११७.८४ १००.५१

सांगली ११६.३४ ९९.१०

सातारा ११७.५५ १००.२४

सिंधुदुर्ग ११८.३० १००.९९

सोलापूर ११६.८२ ९९.५६

ठाणे      ११६.७९ १००.०१

वर्धा      ११६.८९   ९९.६४

वाशिम ११७.२४    ९९.९८

यवतमाळ ११७.७४   १००.४६


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या