भिंगारात लोंखडी राॅड मारून महिलेचा खून ; आरोपी अटक

  
भिंगार येथे पतीने पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल मारुन गंभीर जखमी करून जिवे ठार मारल्याची घटना घडली आहे. सौ. मंदा सुनिल वैराळ (रा. प्लॉट नं. 12. गणपती मंदीरा जवळ, वैदय कॉलनी, जामखेड रोड. ता.जि. अहमदनगर) असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी कि, आरोपी सुनिल हिरामण वैराळ हे नात्याने पती पत्नी आहेत. अहमदनगर येथील जामखेड रस्त्यावरील वैद्य काॅलनी गणपती मंदिराजवळ असलेल्या इमारतीत वरील मजल्यावर भाडेकरू म्हणून कुटुंब राहत होते. सोमवारी राञी ११.१० वाजण्याच्या सुमारास आरोपी वैराळ याने काहीतरी कारणाने पत्नी सौ. मंदा सुनिल वैराळ हिच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल मारुन गंभीर जखमी करून जिवे ठार मारले आहे.

गंगाधर नवनाथ लोढे ( रा. प्लॉट नं. 12, गणपती मंदीरा जवळ, वैदय कॉलनी, जामखेड रोड, ता. जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी सुनिल हिरामण वैराळ याच्यावर गुरनं १६१/२०२२ भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळाताच, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि एस.के. देशमुख, पोसई एम. के. बडकाळी यांनी डॉग स्कॉड, फिंगरप्रिन्ट स्कॉडसहीत घटनास्थळी भेट देऊन पंचनाम केला. आरोपी वैराळ याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास भिंगार पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या