स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो झाली पाहिजे , अशी विनंती पंतप्रधानांकडे केली- अजित पवार


 पुणे –
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहारत विकास कामाच्या उद्घाटनाला वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरातील उदघाट्नच्या कार्यक्रमांना सुरूवात केली आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अधिवेशन सुरू आहे, आज सुट्टी असल्याने सकाळी 7 पासून कार्यक्रम सुरू केले. ठरलं होतं कोठेही भाषण करायचं नाही, भूमिपूजन करायचं, उदघाटन करायचीपण आग्रह होतो बोलावं लागत. झपाट्याने नागरिककरण होत आहे. त्यामुळे विकासाची कामे होणे आवश्यक आहे. शहरात वेगवान वाहतुकीसाठी मेट्रोचे ज़ाळे उभारत आहोत. स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो झाली पाहिजे अशी. विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. त्यासाठी राज्य सरकारचा निधी दिला जाईल. केंद्राचा निधी वेळेवर आला पाहिजे. काम खूप मोठी आहेत, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्ते हे रुंद असलेच पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

लोकांची साथ हवी

शहरातील स्वच्छतेबाबत बोलताना ते म्हणाले लोक कचरा कुठेही टाकतात हात जोडून विनंती आहे, की कुठेही कचत्र टाकू नका. यासाठी एकटं केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका काही करु शकत नाही. प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांची साथ हवी आहे. एकट्या पुण्यात केवढा रस्ता तयार होतो, तो कचरा बाहेर जातो तेव्हा लोक तिकडचे लोक विचारता हे कसं, इकडं कचरा कसा टाकता आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यायला पाहिजे

कोरोना गेलेला नाही

इथं तर काही पठ्ठयांनी मास्क लावला नाही, अरे बाबांनो कोरोना गेला नाही. नाव सांगत नाही आमच्या एका मंत्र्याला दोन महिन्यात तीनदा कोरोना झाला. मी मास्क घालत असून मला दोनदा कोरोना झाला. चायनामध्ये परत कोरोना आल्याच्या बातम्या आहेत. बाबांनो काळजी घ्या. महापालिका, जिल्हा परिषदेवर प्रशासक आला तरी नागरिकांनी काळजी करु नये. तुमचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन ही यावेळी देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या