देवदर्शन आटोपून परतणाऱ्या भाविकांच्या जीपला अपघात पवनचक्कीचे पाते जीपवर कोसळून दोघांचा मृत्यू; तिघे जखमी


अहमदनगर : -  नगर तालुक्यातील देहरे येथे नगर-मनमाड महामार्गावरील भोपे मळ्याजवळ पवनचक्कीचे पाते ट्रेलरमधून जीपवर कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. जीपमधील अन्य कुटुंबीय जखमी झाले. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त कुटुंब श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील असून ते मांढरादेवी दर्शनावरून परतत असताना हा अपघात झाला. सुशील विलास रासकर, श्‍याम बाळासाहेब रासकर अशी मृतांची नावे आहेत. तर जीपमधील विलास अविनाश रासकर, आनंद विलास रासकर, शिल्पा शाम रासकर हे तिघे जखमी झाले आहेत. पाते जीपवर कोसळल्यानंतर जीप चेपली गेली. सुमारे दोन तास जेसीबी व पोकलेन च्या साह्याने प्रयत्न केल्यानंतर जीपमध्ये अडकलेल्या मृत व जखमींना बाहेर काढता आले.  रासकर कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथील दर्शन आटोपून आपल्या गावाकडे परतत होते रात्री दीडच्या सुमारास नगरहुन मनमाडच्या दिशेने ट्रक जात होता. त्याच दिशेने रासकर कुटुंबीयांची बोलेरो जीप जात होती. रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे चुकवण्याच्या नादात ट्रकचा ताबा सुटून ट्रकच्या ट्रेलरवर असलेला पवनचक्कीचे पाते बोलेरो गाडीवर कोसळले. सुमारे दीडशे ते दोनशे फूट लांबीचे असलेले मोठे पाते पडल्याने जीप त्याखाली चेपली गेली. जीपमध्ये 8 मोठी माणसे आणि काही लहान मुले होती. त्यातील सुशील व श्याम रासकर या दोघांचा मृत्यू झाला. विलास, आनंद व शिल्पा रासकर हे जखमी झाले. तर अन्य कुटुंबीय बचावले. सुमारे 200 फूट लांबीचे पाते रस्त्यावर कोसळल्याने रात्रीपासून सकाळपर्यंत त्या बाजूची वाहतूक ठप्प झाली होती वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या घटनास्थळी जेसीबीने अपघातग्रस्तांना जीप मधून बाहेर काढणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या