हॉटेल चालकास दमदाटी करून बिअरसह ५ हजारांची लूट

 आपटी येथे हॉटेल चालकास दमदाटी करून बिअरसह ५ हजारांची लूट;पोलिसांसह ४ जणांवर खंडणीचा गुन्हा भोर


      तालुक्यातील भोर महाड मार्गावरील आपटी  येथे हॉटेल चालकास ४ जणांच्या टोळक्याने पोलिसाचे नाव सांगून दमदाटी करीत ५ हजारांची लूट केल्याची घटना समोर आली असून एका पोलीस  हवालदारासह ४ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरिफ मुन्नान शेख रा.आपटी यांनी भोर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

       या प्रकरणी हकीकत अशी,आरिफ शेख हे आपटी येथे हॉटेल सह परमिट रूम चालवितात.दि.२२ रोजी रात्री ८:३० वा.रवी खोपडे रा.आंबेघर आपल्या मित्रांसह हॉटेलवर आला आणि हॉटेल काऊंटरवर बसलेल्या शेख यांना म्हणाला,पोलीस मुर्हे बाहेर गाडीत बसले असून त्यांनी ४ बिअर आणि ५ हजार मागितले असून आमच्याकडे दया.तसेच आमच्या फोनवरून त्यांच्याशी बोला असे सांगितले.त्यावेळी शेख यांनी पैसे दिल्याशिवाय माल देणार नाही आणि फोनवर बोलणार नाही असे सांगितले.त्यावेळी खोपडे आणि इतरांनी मुर्हेशी बोलत नाहीस तुला  मस्ती आली आहे असे म्हणत बळजबरीने त्यांचे मोबाईलवरून ऑनलाइन ५ हजार घेवून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या बाबत शेख यांनी खोपडे व इतर ज्या स्कॉर्पिओ वाहनातून आले त्या वाहनाच्या नंबरवरून तपास केला असता ते रवी पांडुरंग खोपडे रा.आंबेघर यांचे असल्याचे समजले.याबाबत शेख यांचे वडिलांनी पोलीस हवालदार अमोल मुर्हे यांचेकडे  फोनवर संबंधीत घटनेची चौकशी केली असता मुर्हे यांनी तुम्ही शांत बसा रागावू नका आपण नंतर बोलू असे म्हणून फोन ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी खोपडेसह इतर तिघांवर भोर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस निरीक्षक विट्ठल दबडे यांनी बोलण्यास नकार दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या