युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी बोलणी करण्यास रशिया तयार आहे, मात्र युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅवरॉव्ह यांनी म्हटले आहे.या आठवडय़ाच्या सुरुवातीला युक्रेनतर्फे वाटाघाटीस आलेल्यांना रशियन प्रतिनिधीमंडळाने आपल्या मागण्या सादर केल्या असून, गुरुवारी होणाऱ्या बोलण्यांसाठी युक्रेनच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहात आहोत, असे लॅवरॉव्ह यांनी सांगितले.
पाश्चिमात्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे, त्याच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे आणि युक्रेनचे रूपांतर रशियाविरोधी तटबंदीत करण्यासाठी तेथे तळ बांधले आहेत, असा आरोप लॅवरॉव्ह यांनी केला. यामुळे आपल्या सुरक्षितलेला धोका निर्माण झाल्यामुळेच आपल्याला युक्रेनविरुद्ध कारवाई करणे भाग पडले, असे रशियाचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या