भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २७८ धावांचे लक्ष्य, तिघींनी ठोकले अर्धशतक


आघाडीच्या चार संघांत स्थान मिळवायचे असल्यास हा सामना जिंकत शर्यतीत रहाणे भारतासाठी आवश्यक आहे

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव जमा झाले असतांना बलाढ्य ऑस्टेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताला सुर गवसला आहे. भारताचे आघाडीचे फलंदाज अयशस्वी ठरले असतांना तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकत ऑस्ट्रेलियापुढे मोठं आव्हान ठेवलं आहे. भारताने ५० षटकांत सात विकेट गमावत २७७ धावा केल्या आहेत.


कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटिया यांच्या अर्धशतकी खेळाींमुळे भारताला हा पल्ला गाठता आला आहे. सुरुवातीला दोन विकेट झटपट गमावल्यावर यास्तिका भाटिया आणि मिताली राज यांनी आणखी पडझड न होऊ देता संयमी अर्धशतकी खेळी करत १५० चा पल्ला गाठून दिला.

मग त्यानंतर हरमनप्रीत कौरने ४७ धावांत ६ चौकार लगावत ५७ धावांची झटपट खेळी केल्याने भारताने २७७ चा पल्ला गाठला. तर पुजा वस्त्राकर हीने दोन षटकात आणि एक चौकार लगावत २८ चेंडून ३४ धावा चोपत हरमनप्रीत कौरला चांगली साथ दिली.


तर ऑस्ट्रेलियातर्फे डेरिक ब्राऊन हिने ३० धावांत ३ बळी मिळवले. भारतीय फलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कामगिरी फिकी पडलेली बघायला मिळाली. दरम्यान २७७ धावांचा पाठलाग करतांना ऑस्टेलियाने आक्रमक सुरुवात केली असून अवघ्या सात षटकांत ५० धावांचा पल्ला पार केला आहे. भारताने हा सामना गमावला तर पुढील दोन सामन्यांत चांगल्या फरकाने विजय मिळवणे क्रमप्राप्त असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या