Breaking News

पत्र्याच्या शेडमध्ये लागोपाठ १० सिलेंडर्सचे स्फोट

  


पुणे :
कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे मंगळवारी सायंकाळी स्फोट ‌झाले. एकापाठोपाठ दहा सिलींडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.



आगीत अद्याप कोणी जखमी झाले किंवा नाही, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा साठा बेकायदेशीर साठा कऱण्यात आला असल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

No comments