एकटी हरमनप्रीत लढली
हॅमिल्टन: आयसीसी महिला वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडने भारतावर 62 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने विजयासाठी 261 धावांचे लक्ष्य दिले होते. पण भारताचा डाव 198 धावात संपुष्टात आला. भारताकडून एकट्या हरमनप्रीत कौरने प्रतिकार केला. तिने 63 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. हरमनप्रीतचा अपवाद वगळता अन्य भारतीय महिला फलंदाज अपयशी ठरल्या. आजचा सामना जिंकण्यासाठी सलामीवीर स्मृती मानधना, मिताली राज यांच्याकडून जबरदस्त खेळाची अपेक्षा होती. पण तशी कामगिरी करणं त्यांना करता आली नाही. वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर 107 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
0 टिप्पण्या