पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित

 


पुणे –
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याचा दौऱ्यामध्ये पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही सोहळा ही पडणारा आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका , मेट्रो स्थानक परिसरात . एसपीजी आणि पुणे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा असणार महापालिकेत बंदोबस्त असणार आहे. या या कार्यक्रमासाठी पास असेल त्या व्यक्तीलाच महापालिकेत सोडलं जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.


उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महामेट्रोच्या उदघाटनासाठी पुण्यात येणार आहेत उद्या (6 मार्च) सकाळी 10:30 मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा पारपडणार आहे.

 पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर जातील. तेथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.

मेट्रोचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जंगी सभा होणार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असून , भाजप कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणार आहे.

एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावरील सभा आटोपल्यानंतर हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत.

लवळे येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या