आज युक्रेनच्या दोन शहरांमध्ये मानवतावादी

 


कॉरिडॉर पुन्हा उघडले जातील- रशिया

रशियाने युक्रेनमधील दोन शहरांपुरती युद्धबंदी जाहीर केली असली, तरी मारिउपोल शहराभोवती वेढा घालून असलेल्या रशियन फौजा युद्धबंदीचे पालन करत नसल्यामुळे शनिवारी नियोजित असलेले नागरिकांचे स्थलांतर लांबणीवर टाकण्यात आल्याचे या शहरातील अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.


 सिटी कौन्सिलने एका निवेदनाद्वारे नागरिकांना शहरातील आश्रयस्थळी परतण्याचे आणि स्थलांतरबाबत पुढील सूचनेची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे. रशिया काही भागांत ठरलेली युद्धबंदी पाळत नसून, मारुउपोलसारख्या आघाडीच्या शहरांतून नागरिकांना इतरत्र हलवण्याची संयुक्त योजना हाणून पाडत आहे, असे युक्रेनच्या अध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सी अ‍ॅरेस्टोविच यांनी दूरचित्रवाहिनीवरील प्रक्षेपणात सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या