Breaking News

शाळेत घुसून दहावीत शिकणाऱ्या मुलीवर चाकू हल्ला

 भर कार्यक्रमात वार करुन आरोपी फरार


पुण्यातील वडगाव शेरी येथील शाळेत घुसून एका माथेफिरू तरुणाने दहावीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावशेरी येथील एका शाळेत आज (१४ मार्च २०२२ रोजी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. शाळेमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक एक मुलगा जबरदस्तीने शाळेच्या आवारात आला. त्यानंतर त्याने एका मुलीवर चाकूने सपासप वार केले. कोणाला काही कळण्याआधीच आरोपी तरुण या मुलीवर हल्ला करुन पसार झाला. या घटनेत ती तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या तरुणीवर उपचार सुरू असून ती उपचाराला प्रतिसाद देत आहे. या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकलेलं नाही. पोलीस सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या आधारे या तरुणाचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments