टीम इंडिया विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर

 क्रिकेटमध्ये आजवर कोणी केली नाही अशी कामगिरी

बेंगळुरू:
भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगळुरू येते डे-नाईट कसोटी  मॅच सुरू आहे. टीम इंडियाने चौथ्या डावात श्रीलंकेला ४४७ धावांचे आव्हान दिले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने १ बाद २८ धावा केल्या होत्या. लंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडिस खेळत आहेत. श्रीलंकेला विजयासाठी अद्याप ४१९ धावांची गरज आहे

भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहता तिसऱ्या दिवशी विजय मिळवण्याची शक्यता अधिक दिसते. तसे झाल्यास टीम इंडिया तिसऱ्यांदा श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका क्लीन स्वीप करेल. याआधी १९९३-९४ आणि २०१७ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. जर आज भारताने विजय मिळवला, ज्याची सर्वाधिक शक्यता आहे. असे झाले तर भारताचा घरच्या मैदानावरील हा सलग १५वा कसोटी मालिका विजय असेल. याधी भारताने नोव्हेंबर २०१२ साली इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली होती. तेव्हा महेंद्र सिंह धोनी कर्णधार होता. इंग्लंडविरुद्ध झालेल्या त्या मालिकेनंतर भारताने देशात एकही मालिका गमावली नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर एकाही संघाला घरच्या मैदानावर अशी कामगिरी करता आली नाही.

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताकडून ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी केली. पंतने फक्त २८ चेंडूत शतक पूर्ण केले. यासह त्याने कपिल देव यांचा ४० वर्ष जुना विक्रम मोडला. देव यांनी १९८२ साली पाकिस्तानविरुद्ध ३० चेंडूत अर्धशतक केले होते. तर अय्यरने डे-नाईट कसोटीच्या दोन्ही डावात ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील पाचवा फलंदाज ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या