स्वाभिमानीचा आमदार राष्ट्रवादीनेच फोडला; राजू शेट्टी


आमदारांना फोडून छोटय़ा पक्षांना संपवण्याचा होत असलेला प्रकार म्हणजे साम्राज्यवाद विस्ताराचाच विचार आहे, अशी खंत व्यक्तही त्यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद : भाजपने यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला तर आता राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील पक्षाचे आमदार देवेंद्र भोयर यांना फोडल्याचा आरोप करताना माजी खासदार राजूू शेट्टी यांनी राजकारणात टोळीयुद्ध वाढत असल्याचे सांगितले. आमदारांना फोडून छोटय़ा पक्षांना संपवण्याचा होत असलेला प्रकार म्हणजे साम्राज्यवाद विस्ताराचाच विचार आहे, अशी खंत व्यक्तही त्यांनी व्यक्त केली. यापुढे कार्यकर्त्यांवर संस्कार करूनच राजकारणात आणावे लागेल, असेही ते म्हणाले.

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार बैठकीत शनिवारी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, भोयर यांची हकालपट्टी करण्यामागे त्यांच्याविषयीच्या मतदारसंघातील नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. भोयर यांची विधाने सरकारच्या बाजूने होती. शेतकऱ्यांनी वीजदेयके भरावीत, सरकार चांगले काम करते आहे, अशी विधाने त्यांनी केली. त्यानंतरही त्यांना एक वेळ संधी देता येईल का, याविषयीची मते जाणून घेतली असताना बहुसंख्य नागरिक, कार्यकर्त्यांपैकी कोणीही अनुकूलता दर्शवली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या