महिला विश्वचषकात टीम इंडियानं इतिहास रचला

 

 स्मृती-हरमनप्रीत कौरची धमाल

महिला विश्वचषकात  टीम इंडियाने इतिहासरचला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात भारतानं दोन शतके झळकावली आहेत. या सामन्यात स्मृती मंधनाशिवाय हरमनप्रीत कौरनेही शतक झळकावले आहे. विश्वचषकापूर्वी दोघांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, आता सर्वात मोठे आव्हान असताना संघातील वरिष्ठ खेळाडूंनी हा धमाका केला आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला योग्य ठरवत मंधना आणि यास्तिका भाटिया यांनी सलामीला खेळायला येत संघाला चांगली सुरुवात दिली. या दोघींनी 49 धावांची भागीदारी रचली. पण भाटिया आक्रमक 31 धावांची खेळी करून बाद झाली. त्यानंतर भारतानं कर्णधार मिताली राज आणि दिप्ती शर्मा यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या.


स्मृती-हरमनप्रीत जोडीची धमाल

मंधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांची जोडी जमली. या दोघींनीही चौथ्या विकेटसाठी 184 धावांची दिडशतकी भागीदारी केली आहे. या भागीदारीत मंधनानं 40व्या षटकात हेली मॅथ्यूजविरुद्ध चौकार ठोकत शतकाला गवसणी घातली. तिनं 108 चेंडूत तिचे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यानंतर आक्रमक पवित्रा तिनं स्विकारला होता. 43 व्या षटकात तिला शामेलिया कॉनेलनं बाद केलं. मंधनानं 119 चेंडूमध्ये 123 धावांची खेळी करताना 13 चौकार आणि २ षटकार मारले आहे. हे तिचे विश्वचषकातील दुसरे शतक आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या