काळजाचा ठोका चुकावणारी घटना

 


धक्कादायक! भाडेकरुला रुम दाखवण्यासाठी महिला आतमध्ये गेली अन्..., 


औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी भागातील वडगाव कोल्हाटी भागात एक धक्कादायक घटना समोर आली असून, रूम भाड्याने घेण्याच्या बहाण्याने भरदिवसा घरात घुसलेल्या दोघांनी एका महिलेसोबत मारहाण केली आहे. गॅस शेगडीच्या जाळीने डोक्यात तसेच, तोंडावर मारहाण करत कान फोडले. तर सोसायटीतील महिलांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक दत्तात्रय जगताप (३२, ह. मु देवदुत सोसायटी मोरे चौक), धीरज चंद्रशेखर काळे ( २७ रा. ह. मु मोरे चौक) हे दोघे भामटे वडगाव कोल्हाटी परिसरात असलेल्या द्वारकानगरी सोसायटीत रूम पाहण्याच्या बहाण्याने एका घरात गेले. त्यांना घर दाखवण्यासाठी महिलेने सुद्धा त्यांना घरात प्रवेश दिला. मात्र, घरात घुसताच या दोन्ही भामट्यांनी आतून दरवाजा बंद करत कडी लावली.

यानंतर या दोघांनी घरातील महिलेला लोखंडी जाळीने तिच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली. दरम्यान महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केली. महिलेचा आवाज आयकून सोसायटीतील महिला आणि तरूण एकत्र जमले. मात्र, घराची कडी आतून लावलेली असल्याने, महिलांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.


घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भामटयांच्या तावडीतून त्या महिलेची सुटका करत त्यांना त्याब्यात घेतले. तर सदर महिला ह्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


दोन भामट्यांनी भर दिवसा घरात घुसून एकट्या महिलेवर हल्ला केल्याच्या घटनेनंतर या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तर महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तसेच हल्ला झालेल्या महिलेचा आरडाओरडा जर आजूबाजूला आयकू आले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती अशेही चर्चा या भागात सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या