…म्हणून काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत ची गरज भासणार नाही : अमित शाह


केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह बोलत होते.

जम्मू-काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत सुरक्षा दलाची गरज भासणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलंय. ते शनिवारी जम्मूमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध लढ्याबद्दल आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नं केलेल्या कामाचं कौतुक केलं.

“जम्मू आणि काश्मीर, नक्षलग्रस्त भाग आणि ईशान्येकडील भागात सीआरपीएफ ज्या मेहनतीने  काम करत आहे, मला खात्री आहे की पुढील काही वर्षांत या तिन्ही प्रदेशांमध्ये सीआरपीएफची गरज भासणार नाही. याचे संपूर्ण श्रेय सीआरपीएफला जाईल,” असं अमित शाह सीआरपीएफ जवानांना संबोधित करताना म्हणाले. शिवाय  गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे असं म्हणत त्यांनी कलम ३७० आणि ३५अ रद्द केल्यानं जम्मू-काश्मीरच्या लोकांना फायदा झालाय, असं सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या