वेशाव्यवसाय सुरू करण्यासाठी ४ नराधमांचं भयंकर कृत्य


 औरंगाबाद
: शहरातील जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, घटस्फोटीत महिलेवर आधी चौघांनी अत्याचार केला. त्यानंतर तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेला वेशाव्यवसाय करण्यास भाग पाडले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी सुशील जगन्नाथ साध्ये आणि अजय विष्णु मुळे या दोघांना अटक केली असून, इतर आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार लोन घेताना ३८ वर्षीय पीडितेची ओळख आरोपी साध्ये याच्याशी झाली होती. दरम्यान, पेढ्यातून गुंगीची औषध देत आरोपींनी तिच्यावर २७ मे २०१९ रोजी अत्याचार करत मोबाइलमधील रेकॉर्डींग व फोटो काढले. पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर इतरांनी वारंवार अत्याचार केला. पीडितेने आरोपीकडून एक लाख रुपये उसने घेतले. मात्र, कर्ज वेळेवर न फेडल्याने लोहार याने पीडितेच्या घरी रामचंद्र पाटील याला आणले. त्यानेही पीडितेवर अत्याचार केला.

यानंतर पीडिता व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार लोहार व त्याची पत्नी श्रद्धा लोहार या दोघांनी पीडितेकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. आरोपी ग्राहकांना पीडितेच्या बँक खात्यावर पैसे टाकायला सांगत, त्यानंतर ते पैसे पीडितेला काढायला सांगून ते पैसे स्वतः काढून घेत होते. त्यानंतर पिडीतीने दिलेल्या फर्यादीनुसार या प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या