११ वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार!


सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुणे : पुण्यात आणखी एक संतापजनक व धक्कादायक अशी घटना घडली आहे. शहरातील वडगावशेरी भागातील एका शाळेत घुसून दहावीत शिकणार्‍या मुलीवर चाकूने हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवाजीनगर येथील एका शाळेत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (गुरुवार) दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील मुलींच्या शाळेत पीडित मुलगी शाळेमध्ये असताना एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने तिला बोलण्यात फसवून शाळेच्या बाथरूम नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर संबंधित व्यक्तीने त्या मुलीस या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला बघतो, अशी धमकी दिली.

मात्र घडल्य प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या मुलीने तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित अनोळखी व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असुन, पीडित मुलीकडून अधिक माहिती घेतली जात असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या