युक्रेनच्या खारकीव शहरात रशियाकडून बॉम्ब हल्ले


 अमेरिकेकडून रशियाने केलेल्या हल्ल्याचा निषेध

रशियाकडून पोलंडच्या सीमेजवळील यव्होरीव्ह येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर पीसकीपिंग अँड सिक्युरिटीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला असून, रशियाने ही क्रुरता थांबवावी असे म्हटले आहे.


युक्रेनच्या खारकीव शहरात रशियाकडून बॉम्ब हल्ले

युक्रेनच्या खारकीव शहरात रशियाकडून बॉम्ब हल्ले, मानवी वस्तीत बॉम्बस्फोट


रशिया, युक्रेन युद्धाबाबत अमेरिका आणि फ्रान्समध्ये चर्चा

रशिया, युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये चर्चा झाली असून, यावेळी दोनही नेत्यांनी रशियाचा निषेध केला. त्याचबरोबर युक्रेनला पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे.रशियन सैनिकांचे युक्रेनमध्ये हवाई हल्ले सुरूच

रशियन सैनिकांचे युक्रेनमध्ये हवाई हल्ले सुरूच


19 शहरांमध्ये रेड अलर्ट


युक्रेन सैनिकांचे रशियन सैनिकांना प्रत्युत्तर


युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा 19 वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये करण्यात येत असलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमधील अनेक मोठी शहरं ओस पडली आहेत. युद्धाच्या भीतीपोटी बारा लाखांहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. अनेक युक्रेनियन नागरिक शेजारच्या पोलंडच्या आश्रयाला गेले आहेत. या युद्धात जीवित आणि वित्तीहानी देखील मोठ्याप्रमाणात झाली आहे. दरम्यान सयुक्त राष्ट्र संघाने केलेल्या दाव्यानुसार या युद्धात आतापर्यंत 596 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 1,067 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या