बीडमध्ये जुन्या वादातून घर पेटवलं

 वृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर, शहरात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा


बीड :
शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बीड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा हा प्रकार आहे. पेठबीडच्या बलभीम नगरमध्ये जुन्या वादातून एका माथेफिरुनं घर पेटवून दिल्याची घटना घडलीय. या आगीत संपूर्ण संसार जळून खाक झालाय. या घटनेवरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे पुन्हा एकदा तीनतेरा वाजल्याचं बीड शहरातून समोर आलंय. माथेफिरुन घर पेटवून दिल्यानं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पेठबीड परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे घर पेटवून देण्यासारखी घटना घडत असताना पोलिसांचं धाक राहिला नाही का, हाही प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. बीड शहरातील ही धक्कादायक घटना समोर आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वृद्ध वामन कांबळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे.


वृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर

पेठबीडच्या बलभीम नगरमध्ये घर जाळण्याचा झालेला प्रकार गंभीर असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घरात घुसून जुन्या वादातून कुरापती काढून एका माथेफिरूनं वृद्धाला घरात घुसून मारहाण केली. त्यानंतर घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. घरात लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. या आगीत संपूर्ण संसार उद्धवस्त झाल्यानं वृद्ध दाम्पत्य उघड्यावर आलं आहे. दरम्यान, बीड शहरातील पेठबीडच्या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा

बीड शहरातील पेठबीडच्या बलभीम नगरमध्ये घडलेला प्रकार धक्कादायक असून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी होतेय आहे. आता यामध्ये वृद्ध दाम्पत्याचा संसार मात्र पूर्णपणे उद्धवस्त झालाय. पेठबीडमधील या प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं समोर आलं आहे. आता याप्रकरणी आणि असे प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस काय प्रयत्न करतात, ते पाहणं महत्वाचं ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या