येत्या तीन-चार दिवसात राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता


महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण कालपासून निर्माण झालं आहे तर काही ठिकाणी हल्या सरीही बरसल्या आहेत.

राज्यातील काही भागात पुढचे २ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसोबत महाराष्ट्रावरही होणार आहे. चक्रीवादळाचा थेट तडाखा महाराष्ट्राला बसणार नाही. परंतु महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण कालपासून निर्माण झालं आहे तर काही ठिकाणी हल्या सरीही बरसल्या आहेत. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात तर २३ ते २५ आणि मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या ढगाळ वातावरणाचा शेतीवर जास्त परिणाम दिसून येत आहे. आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसू शकतो. दरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी अद्यापही कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. मराठवाडय़ात परभणी, नांदेडमध्येही ४० अंश कमाल तापमान असल्याने या भागात उन्हाचा चटका कायम आहे. मुंबई परिसरासह कोकणात सध्या कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ आला आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर, जळगाव भागात कमाल तापमान ४० अंशापुढे आहे. उर्वरित भागात तापमान सरासरीजवळ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या