पुणे: रूम सोडताना डिपॉझिट परत मागितले म्हणून PG चालवणाऱ्या दोन बहिणींना रूममध्ये बंद करून मारहाण केली. चंदन नगर येथे हा प्रकार घडला असून चंदन नगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी चक्रनारायण (वय २०) व रुचिता चक्रनारायण (वय २१) अशी मारहाण झालेल्या मुलींची नावे आहेत तर पेईंग गेस्ट मालकीण तृप्ती माने व श्वेता थोरात यांच्या विरुद्ध कोंडून ठेवून मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या असलेल्या या मुली नोकरी तसेच शिक्षणासाठी चंदननगर येथे तृप्ती माने व श्वेता थोरात यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून रहात होत्या. रूम खाली करत असताना चार हजार रुपये डिपॉझिट परत मागितल्याच्या कारणावरून त्यांना घरात कोंडून ठेवून मारहाण करण्यात आली. या मुलींचा मित्र त्यांच्या मदतीला आल्यानंतर या दोघींची सुटका झाली. घडलेल्या प्रकारानंतर मुलीनी चंदननगर पोलिसांत बुधवारी रोजी रात्री तक्रार दिली आहे.
0 टिप्पण्या