पत्नीने दिला पतीला नवा जन्म

 किडनीदान करणाऱ्या छाया जैस्वाल यांचा भाजपने केला गौरव

श्रीरामपूर : पती एकेकाळी राजकारण व समाजकारण यामध्ये आघाडीचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय. अचानक तते आजारी पडले.  लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये चक्रा सुरू झाल्या. आणि एक दिवस डॉक्टर सांगतात तुमच्या पतीची किडनी निकामी झाली आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या या बातमीने पत्नीच्या पायाखालची वाळूच सरकली. आणि मग त्यांचे कुटुंबिय एका भीतीखाली दबावाखाली आले.  घराचा कुटुंबप्रमुख, कर्ता धर्ता पुरुषच आजारपणामुळे अंथरुणाला खिळून राहिला. त्याला नवीन किडनी मिळाल्याशिवाय पर्यायच नव्हता. 

रुग्णालयांमध्ये चकरा सुरू झाल्या.  किडनीचा, किडनीदात्यांचा शोध सुरू झाला. किडनी मॅच होईल की नाही ? कोणाचा कोणता रक्तगट याच्या चाचण्या तपासण्या सुरू झाल्या.  यात हे कुटुंब थकून चालले होते.  अखेर पत्नीनेच पुढे होत पत्नीसाठी आपली किडनी देण्याची तयारी दाखवली. श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय जैस्वाल यांच्या आजारपणाची नव्हे तर नव्या जीवन मार्गक्रमणाची ही कहानी.  पत्नीनेच आपल्या पतीला किडनी देण्याचा निर्णय झाला. रुग्णालयात विजय जैस्वाल यांच्या अर्धांगिनी, पत्नी छाया यांच्या रक्तगटाची तपासणी करण्यात आली व पॉझिटिव्ह रक्तगट तपासणीतून समजला. रक्तगट म्हणजे कोणत्याही रक्तगटाला रक्त देणाऱ्या रक्तदात्यांचा रक्तगट.  रक्ताची चाचणी झाली आणि डॉक्टरांनी ठरवलं की छाया यांच्या किडनीचे त्यांचे पती विजय यांना प्रत्यारोपण करायचे.  औरंगाबादच्या कमलनयन बजाज रुग्‍णालयात ही किडनी प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया व इतर सर्व आवश्यक औषधोपचार पार पडले. आता या किडनी प्रत्यारोपणाला सहा महिने होऊन गेले. काही महिन्यांपूर्वी किडनी निकामी झाल्यामुळे विजय जैस्वाल हे मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचले होते. पण त्यांची अर्धांगिनी छाया यांनी स्वतःची किडनी आपल्या पतीला दिली अन् सामाजिक कार्यकर्ते विजय जैस्वाल यांना एक नवा जन्मच मिळाला. शेवटी पत्नी ही एक आईच असते, हेच छाया जैस्वाल यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले. आपल्या पतीला नवा जन्म देणाऱ्या या पत्नीचा,  अर्धांगिनीचा, नारी शक्तीचा किडनी दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या शहर पदाधिकार्‍यांनी यथोचित गौरव केला. या छोटेखानी गौरव सोहळ्यामध्ये जैस्वाल पती-पत्नी आनंदून गेले होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, श्रीरामपूर शहराध्यक्ष मारुती बिंगले, शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे, सांस्कृतिक आघाडीचे उत्तर जिल्हा ध्यक्ष, किरण रोकडे यांच्या हस्ते जैस्वाल  दाम्पत्याचा महिलादिनी गौरव  करीत त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या