“जी. टी. टी. फाउंडेशन च्या ‘WeChimni’उपक्रमातून स्त्रियांना मिळणार व्यवसाय-स्वप्नपूर्तीची सुवर्णसंधी ”


पुणे 
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्त्रियांच्यासक्षमीकरणासाठी जी.टी. टी.फाउंडेशनच्यानवीन संकेतस्थळWeChimni’या प्रकल्पाचा उदघाटन समारंभ,काल दिनांक २२ मार्च २०२२ रोजी,सुमंत मूलगावकर स्टेडियम,पुणे येथे पार पडला.जी.टी.टी.फाउंडेशन आणिRBLबँकेमार्फत हा प्रकल्प महिलांचे सक्षमीकरण आणि आधुनिक व्यवसायप्रणाली यावर आधारलेला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी जेष्ठ समाजसेवक,पर्यावरणवादी आणि कृषी शास्त्रज्ञ,  कृषिरत्न डॉ.बुधाजीराव मुळीकहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सन्माननीय अतिथी म्हणूनटेस्टी बाईट चे सहसंस्थापक मा.श्री.रवी निगमउपस्थित होते.पुण्याच्या पहिल्या महिला महापौर मा.कमलताई व्यवहारे,यांची उपस्थिती होती. या सोबतRBLबँकेचे प्रतिनिधीआणिGTTफाउंडेशनच्या संस्थापिकामा.उमा गणेशदेखील उपस्थित होते.

जी.टी.टी.फाउंडेशन हि सामाजिक संस्था आहे.समाजसेवेला प्रथम स्थानी मानणारी हि संस्था,समाजातील अल्पउत्पन्न असलेल्या घटकांसाठी नेहमीच निरनिराळे प्रकल्प राबवत असते. या प्रकल्पातून समाजातील प्रत्येक घटक स्वावलंबी आणि स्वतंत्र व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.यावेळी हि जी.टी.टी.फाउंडेशनने स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वतंञ करण्यासाठीWeChimnieकॉमर्स वेबसाइट हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. हीएक ई कॉमर्सWebsiteआहे,याच्या माध्यमातूनछोट्या घरगुतीप्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या महिला उद्योजिकांना त्यांची प्रतिभा आणि व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहे आणि त्यांचे उत्पादनहीवाढण्यास नक्कीच मदत होईल. स्त्रियांना त्यांची क्षमता जगभरात सिद्ध करता यावी,त्यांच्या स्वप्नपूर्तीचे मार्ग मोकळे व्हावे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे हा या प्रकल्पाचा मूळ उद्द्येश्य आहे.

प्रमुख पाहुणे डॉबुधाजीराव मुळीक आणि रवी निगम यांच्या हस्तेwww.wechimni.orgसंकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले.सर्व आमंत्रितांना आणि प्रेक्षकांनाWebsiteची माहिती देण्यात आली. RBLबँकेच्या एचआर,सीएसआर आणि अंतर्गत ब्रँडिंग प्रमुखशांता वॅल्युरी गांधी यांना उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी व्हिडिओ क्लिप च्या माध्यमाने महिला उद्योजकांना संबोधित केले.“भारताच्या जीडीपी वाढीमध्ये महिलांचे योगदान १८% आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून हे योगदान जास्तीती जास्त प्रमाणावर व्हावे अशी आमची अपेक्षा आहे.” अशी माहिती शांता वॅल्युरी गांधी यांनी दिली. उद्योजकांच्या उत्पादनांनाBBआणिBCप्रमाणावर मागणी वाढावी आणि त्यांची स्वप्नपूर्ती व्हावी. या संधीचा अधिकाधिक महिलांनी फायदा घ्यावा आणि त्यांची ध्येयपूर्ती करावी अशी इच्छा यावेळी शांता वॅल्युरी गांधी यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे,कृषिशास्त्रज्ञ श्री बुधाजीराव मुळीक यांनी ही महिलांशी संवाद साधला.“स्त्रिया प्रतिकूल परिस्थितीत धैर्य न गमावता योग्य निर्धार घेऊन आपली प्रगती करतात. स्त्री नेहमीच समाजाच्या विकासामध्ये अनमोल योगदान देते.” असे मत कृषिशास्त्रज्ञ श्री बुधाजीराव मुळीक यांनीमांडले.

टेस्टी बाईट चे संस्थापक श्री. रवी निगम यांनी नारीशक्तीचा पुरजोर पुरस्कार करत जमलेल्या महिलांचे मार्गदर्शन केले. “ छोट्या व्यवसायातून मोठी प्रगती होऊ शकते,कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करताना ग्राहकांना सर्वप्रथम प्राधान्य द्यावे.” असा सल्ला श्री रवी निगमयांनी दिला. यावेळी,महिला उद्योजकांनी बनवलेले आकर्षक वस्त्र परिधान करून जी.टी.टी. फाउंडेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी फॅशन शो सादर केला. हा फॅशन शो कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या कार्यक्रमामध्ये महिला उद्योजक बहुसंख्य प्रमाणात उपस्थित राहिल्या होत्या.

 

 

स्त्री सक्षमीकरणासाठीWeChimniकश्या प्रकारे सहाय्य करेल,उत्पादन वाढीत कसा फायदा होणार याबाबतजी.टी.टी. फाउंडेशनच्या संस्थापिका मा.उमा गणेश यांनी दिले.महिला उद्योजिका सौ.रंजना जगताप आणिसौ.जान्हवी सोगम या लाभार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.जी.टी.टी.फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनीषा शर्मा यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि ओळख करून दिली.फाउंडेशनचेडिरेक्टर ऑफ ऑपरेशन्स श्री.सागर काबरा यांनी कार्यक्रमाची सांगता केली.गंधाली देशपांडे आणि नेहा ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या