24 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार


 आरोपींमध्ये पुतण्याचाही समावेश, बीडमधील संतापजनक घटना

बीड :  महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता बीड जिल्ह्यातून  एक संतापजनक आणि धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. एका 24 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार  झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आलीय. बीडमधील एका 24 वर्षीय विवाहितेवर नात्याने चुलत पुतण्या असणाऱ्या एकाने, गुंगीचे ज्यूस देऊन अहमदनगर शहरात बलात्कार केला. तर दुसऱ्याने अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे यावेळी तिघा नराधमांनी रात्रभर छेड काढली.

नात्यातीलचं नराधम तरुणांनी हे कृत्य केल्यानं बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते सर्व रा. बेलुरा या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या