Breaking News

अवघ्या 6 दिवसात ओला स्कूटर पडली बंद ; ग्राहकानं काढली स्कूटरची धिंड


बीड
 : मधील परळीच्या रस्त्यावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं, रस्त्यावरुन गाढवाच्या पाठिमागे स्कूटर बांधून स्कूटरची धिंड काढण्यात आली. त्याचं झालं असं, परळीच्या सचिन गित्ते यांनी ओला कंपनीची इलेक्ट्रीक स्कूटर घेतली... पण अवघ्या ६ दिवसांत ही स्कूटर बंद पडली.... आणि ही स्कूटर काही केल्या पुन्हा सुरुच झाली नाही... कंपनीला तक्रार करूनही कंपनीकडून काहीच रिप्लाय आला नाही. शेवटी या ग्राहकांनं वैतागून बंद पडलेली दुचाकी गाढवाला बांधत परळीतील रस्त्यावरुन ओढत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला व ओला कंपनीच्या या दुचाकी फसव्या असल्याने त्या घेवु नयेत असे यावेळी जनतेला आवाहन ही केले.

Post a Comment

0 Comments