आजपासून राज्यात काय काय बदल ?

 


मास्क गेले, कोणकोणते निर्बंध मागे

मुंबई – राज्यात कोरोनाचा  संसर्ग वाढू लागल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 8 जानेवारीला कडक निर्बंध जाहीर केले. मागच्या दोन वर्षांत लागू केलेले निर्बंध परिस्थितीनुसार शिथील करण्यात आले होते. तर काही निर्बंध पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र  राज्य सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतला. या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर अखेर राज्य कोविड निर्बंध मुक्त झालं आहे. काल घेतलेल्या निर्णयामुळे जनतेला एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. तरी सुध्दा कोरोनाच्या बाबतीतले काही नियम जाणीवपुर्वक समजून घेणे गरजेचे आहे. मास्कमुक्त , कोविडनिर्बंधमुक्त, यासोबत आजपासून राज्यात काय काय बदल ? हे आपण समजून घेणार आहोत.

आता महाराष्ट्रात मास्क वापरणं बंधकारक नाही, परंतु ते ऐच्छिक असणार

आता महाराष्ट्रात मास्क वापरणं बंधकारक नाही, परंतु ते ऐच्छिक असणार आहे. म्हणजेच तुम्ही आता मास्क वापरला नाही म्हणून तुमच्यावर कोणीही कारवाई करणार नाही. पोलिस किंवा इतर कुठलीही प्रशासन तुम्हाला कसल्याही प्रकारचा दंड करू शकणार नाहीत. मास्क फ्री महाराष्ट्र कायदेशीरपणे जाहीर केला असला तरीसुद्धा तो ऐच्छिक ठेवलाय. म्हणजेच मास्क फक्त तुम्हाला कोविडपासूनच वाचवतो असं नाही तर इतर आजारांपासूनही संरक्षण देतो. कोविडचं संकट पूर्णपणे हटलंय असं म्हणता येत नाही. चीनमधे अजूनही शांघायसारखी शहरं लॉकडाऊन होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मास्कमुक्ती जाहीर केली असेल तरीसुद्धा मास्क वापराल तर फायदाच होईल.


मित्रं बोलावू शकता, आनंदानं साजरा करु शकता.


कोविडच्या काळात लग्न आणि इतर समारंभासाठी मोठी बंधने राज्य सरकारकडून लागू केली होती. पाहुण्यांच्या संख्येवर मर्यादा होत्या. आता कोविडचे सर्व बंधनं राज्यातून हटवली आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच तुम्ही हवे तेवढे पाहुणे, मित्रं बोलावू शकता. आनंदानं साजरा करु शकता. कालच्या निर्णयामुळे लोकांच्यात एक वेगळा आनंद पाहायला मिळत आहे. हॉटेल, मॉल किंवा इतर अशा ठिकाणी जाताना दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्रं सर्रास विचारलं जायचं. आता ते विचारलं जाणार नाही. यात सिनेमागृह सुद्धा आली. कधी कधी ते प्रमाणपत्रं नसायचं. पण आता निर्बंध उठवल्यामुळे यातूनही सुटका असेल. याचा अर्थ असा नाही की लगेचच ते प्रमाणपत्रं मोबाईलमधून डिलिट करावं. ते वापरणे सहज शक्य असेल तर ते नक्की ठेवा.


हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट रेग्युलर वेळेनुसार बंद होतील


मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबादसह मोठ्या शहरात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट अशा ठिकाणी निर्बंध होते. ते बंद करण्यासाठीही वेळेची मर्यादा होती. पण महाराष्ट्र राज्य सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतल्यामुळे रेग्युलर वेळेनुसार बार बंद होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या