नवी दिल्ली : भारताने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथील गस्ती पॉइंट १५ वरून फौजा परत घ्याव्यात हा चीनचा प्रस्ताव भारताने फेटाळून लावला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी गेल्या महिन्यात भारतात आले होते, त्याच सुमारास चीनने हा प्रस्ताव भारतापुढे ठेवला होता.
’पेट्रोलिंग पॉइंट १५’ (पीपी १५)वर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून भारतीय फौजांच्या समोरासमोर असलेल्या भारतीय फौजा पीपी १६ व पीपी १७ दरम्यानच्या करमसिंग चौकीपर्यंत मागे न्याव्यात असा प्रस्ताव चीनने ठेवला होता, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. आपण आपल्या फौजा प्रत्यक्ष ताबा रेषेच्या थोडय़ा मागे घेऊ असे चीनने सांगितले होते.
चीनची दावारेषा आणि भारताच्या दृष्टीने असलेली प्रत्यक्ष ताबा रेषा पीपी १५ वर जवळजवळ छेदत असल्यामुळे भारताला हा प्रस्ताव मान्य होण्यासारखा नव्हता, असे सूत्रांनी सांगितले. भारताने हा प्रस्ताव मान्य केला असता तर चिनी फौजा फारच कमी अंतर मागे गेल्या असत्या, पण भारतीय फौजांना अनेक किलोमीटर मागे यावे लागले असते.
0 टिप्पण्या