गाझियाबादमधील झोपडपट्टीत भीषण आग, १०० गायींचा होरपळून मत्यू

 उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील इंदिरापुरम भागातील झोपडपट्टीत भीषण आगीची घटना घडली. इंदिरापुरमच्या झोपडपट्ट्यांतील आगीच्या ज्वाळा दुरूनच दिसत होत्या. या दुर्घटनेत १०० गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झोपडपट्टीत ठेवलेल्या घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. पाहता पाहता आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले.


इंदिरापुरमच्या झोपडपट्टीत आग लागल्यानंतर लोकानी अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले.

श्री कृष्ण गोसेवेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की, ” रद्दीमध्ये लागलेल्या आगीमुळे १०० हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. सर्व गायी दुध न देणाऱ्या होत्या.” या भीषण दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. गाझियाबादचे डीएम आणि एसएसपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीच्या बाजूला कचरा पडलेला होता. जिथे सुरुवातीला आग लागली आणि नंतर या आगीने रौद्ररूप धारण केले. थोड्यावेळातच आगीने संपूर्ण परिसराला वेढले त्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. सुरुवातीला आग लागल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ पाणी टाकण्यास सुरुवात केली, मात्र प्रचंड उकाडा आणि वाऱ्यामुळे अधिकच पसरत गेली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या