भारतातील करोनाबळी नक्की किती?

 मृतांची संख्या कितीतरी अधिक ; ‘डब्ल्यूएचओ’ मोजण्याचे निकष चुकीचे : केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : करोनामृतांची जागतिक आकडेवारी जाहीर करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांमध्ये भारत अडथळे आणत असल्याच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताच्या अनुषंगाने भारताने करोनाबळींचा अंदाज लावण्याच्या संघटनेच्या पद्धतीवरच रविवारी प्रश्नचिन्ह निर्माण केले. मात्र या आरोप-प्रत्यारोपांमुळे भारतातील करोनाबळी नक्की किती, याबाबत जगामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

भौगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या बाबतीत विशाल असलेल्या देशात करोना मृत्यूच्या आकडेवारीचा अंदाज लावण्यासाठी अशी गणितीय पद्धत लागू केली जाऊ शकत नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
भारतातील करोनाबळी नक्की किती? ; मृतांची संख्या कितीतरी अधिक ; ‘डब्ल्यूएचओ’ मोजण्याचे निकष चुकीचे : केंद्राचे उत्तर
डब्ल्यूएचओच्या सध्याच्या विश्लेषण पद्धतीत ‘विकसित’ गटातील देशांतून थेट प्राप्त झालेल्या मृत्यूच्या आकडय़ांचा वापर केला जातो,



शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद

सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; म्हणाले “पुरंदरेंनी मला…”
‘हिमालयात जाईन’ या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “त्याच्या खोलात…”
ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत प्रवेश, या ३ राशींना धनलाभ सोबतच प्रगतीची प्रबळ शक्यता
‘‘जागतिक करोना मृत्यू जाहीर करण्याच्या डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांत भारताची खीळ ’’ या शीर्षकाखालील ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताला उत्तर म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीने एक निवेदन जारी केले. भारताने अनेक वेळा ‘डब्ल्यूएचओ’च्या पद्धतीबद्दल लेखी चिंता व्यक्त केली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. भारत संबंधित विषयावर ‘डब्ल्यूएचओ’शी नियमित आणि सखोल तांत्रिक देवाणघेवाण करत आहे. डब्ल्यूएचओच्या सध्याच्या विश्लेषण पद्धतीत ‘विकसित’ गटातील देशांतून थेट प्राप्त झालेल्या मृत्यूच्या आकडय़ांचा वापर केला जातो, तर भारताचा समावेश असलेल्या ‘विकसनशील’ गटातील देशांसाठी ‘मॅथेमॅटिकल मॉडेिलग’ प्रक्रिया वापरण्यात येते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारताचा मूळ आक्षेप विश्लेषणातील निष्कर्षांवर नाही, तर त्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीवर आहे, असेही भारताने स्पष्ट केले आहे.

‘विकसित’ गटातील देशांमधील आकडेवारीचा उपयोग आणि भारताच्या १८ राज्यांमधील न तपासलेल्या माहितीचा वापर करून डब्ल्यूएचओची ही पद्धत अतिरिक्त मृत्यूच्या अंदाजांचे दोन अतिशय भिन्न आकडे देते. अंदाजांमधील एवढय़ा मोठा फरकामुळे संबंधित पद्धतीच्या वैधतेबद्दल आणि अचूकतेबद्दल शंका उपस्थित होते, असेही भारताने म्हटले आहे. याबाबतचे भारताचे म्हणणे आतापर्यंतच्या सहा पत्रांद्वारे डब्यूएचओला कळवण्यात आले आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

भारत ‘डब्ल्यूएचओ’शी सहकार्यास नेहमीच तयार आहे. कारण यांसारखी माहिती धोरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरते. त्यामुळे कार्यपद्धतीबद्दल सखोल स्पष्टता आणि त्याच्या वैधतेचा स्पष्ट पुरावा महत्त्वाचा आहे.

‘विकसित’ देशांमधील आकडेवारी आणि भारताच्या १८ राज्यांमधील न तपासलेली आकडेवारी वापरून डब्ल्यूएचओची गणितीय पद्धत मृत्यूच्या अंदाजांचे वेगवेगळे आकडे देते. अंदाजांमधील फरक या पद्धतीच्या वैधतेबद्दल आणि अचूकतेबद्दल चिंता निर्माण करणारा आहे, असे भारताने म्हटले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त..

’करोनामुळे जगभरात साठ लाख मृत्यू झाल्याचे मानले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मात्र ही आकडेवारी दीड कोटी असून, एकटय़ा भारतात ४० लाख करोनाबळी गेले.

’रविवारी संध्याकाळी भारताकडून मृतांची अधिकृत जाहीर झालेली आकडेवारी ही पाच लाख बावीस हजार इतकी होती.

’मात्र न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तात भारत करोना मृत्यूची जागतिक आकडेवारी जाहीर करण्याच्या डब्ल्यूओच्या प्रयत्नांना खीळ घालत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारताचे म्हणणे..

विकसित आणि कमी लोकसख्येच्या देशांतील मधील आकडेवारी आणि विकसनशील गटात समावेश होणाऱ्या भारताच्या १८ राज्यांमधील न पडताळलेली आकडेवारी वापरून ‘डब्ल्यूएचओ’ची गणितीय पद्धत मृत्यूच्या अंदाजांचे दोन अत्यंत भिन्न आकडे सादर करते. दोन्ही अंदाजांमधील इतका मोठा फरक या पद्धतीच्या वैधतेबद्दल आणि अचूकतेबद्दल चिंता निर्माण करणारा आहे, असे भारताने आक्षेप घेताला नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या