आधी पत्नीच्या डोक्यात कुदळ घातली... मग मुलाला फाशी दिली...


 हत्याकांडानंतर नराधमाने व्हिडीओ काढून गावकऱ्यांना पाठविला..


 रामनवमीच्या दिवशी घडलेल्या थरारनाट्याने जिल्हा हादरला...


नगर : कौटुंबिक वादातून एका नराधमाने 

पत्नीच्या डोक्यात कुदळीने वार करून तिचा खून केला त्यानंतर पाच वर्षाच्या मुलाला आंब्याच्या झाडाला फाशी दिली आणि स्वतः त्याचा व्हिडिओ करून कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना पाठविला. विशेष म्हणजे त्याने पोलीस पाटलाला फोन करून घटनास्थळी बोलावले आणि फिर्याद देण्यासंदर्भात सूचनाही केली. तालुक्यातील गोंधवणी डिगी आणि निमगाव खैरी गावाच्या शिवारात ही धक्कादायक घटना घडली.

रामनवमीच्या दिवशी सकाळी 10 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने श्रीरामपूरसह जिल्हा हादरला. बलराम दत्तात्रेय कुदळे (वय 40 ) असे आरोपीचे नाव आहे.

अक्षता बलराम कुदळे (वय 35 वर्ष) मुलगा शिवतेज (वय पाच वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

कुदळे कुटुंबीय गोंधवणी गावात राहते. बलराम याचे त्याच्या आई-वडिलांशी पटत नव्हते. तो पत्नी व मुलासह शेतात घर बांधून राहत होता. त्यांच्यातही काही दिवसांपासून भांडणे होत होती. भांडणाला कंटाळून अक्षदा मुलासह काही दिवस माहेरी राहिली नुकतीच ती पुन्हा आपल्या घरी आली होती. सहा महिन्यापासून बलराम पत्नी व मुलाची हत्या करण्याचा कट रचत होता. आज त्याला संधी ती मिळाली. घरासमोर पत्नी काम करत असताना बलरामने पाठीमागून जाऊन तिच्या डोक्यात कुदळीने वार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पाच वर्षांचा मुलगा शिवतेज याला त्याने घरापासून सुमारे शंभर फूट अंतरावर असलेल्या आंब्याच्या झाडाला फाशी दिली. मुलाचा जीव जाईपर्यंत सुमारे दहा ते पंधरा मिनिटे तो तेथेच थांबला. त्यानंतर या थरार नाट्याचे मोबाईल वर चित्रीकरण करून बलराम याने स्वतः ही घटनेची कुटुंबीयांना व गावकऱ्यांना चित्रफित पाठवली.  आरोपीने दिघीचे पोलीस पाटील यांना फोन करून दोन खून झाल्याबद्दल माहिती दिली व त्यांना घटनास्थळी बोलावले. घटनास्थळी पोहोचताच पोलीस पाटीलही अचंबित झाले. स्वतःच्या जीवाची त्यांना भीती वाटली. यावेळी आरोपी बलराम यानेच आपल्याला फिर्याद द्यायला जावं लागेल, अशी सूचना केली. भेदरलेल्या पोलीस पाटलांनी 'तुम्ही इथेच बसा, मी फिर्याद देऊन येतो', असे सांगून तेथून काढता पाय घेतला. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर दुपारी पोलीस घटनास्थळी हजर झाले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बलराम कुदळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या