Breaking News

शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या; सर्वजण घरात असतानाच बेडरुममध्ये घेतला गळफास


मुबई :
कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रजनी या ४२ वर्षांच्या होत्या.

नेहरूनगर येथील केदारनाथ मंदिर परिसरामध्ये कुडाळकर राहतात. रविवारी सायंकाळी सरवजन घरात असतानाच त्यांच्या पत्नी रजनी यांनी स्वत:च्या बेडरुममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. रजनी या मंगेश यांच्या द्वितीय पत्नी होत्या. काही वर्षांपूर्वी मंगेश यांच्या पहिल्या पत्नीचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांनी रजनी यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन मुले आहेत. वर्षभरापूर्वी मंगेश यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचा कुर्ल्यामध्ये अपघाती मृत्यू झाला होता.
पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रजनी यांचा मृतदेह ताब्यात घेतल्या. रजनी यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं यासंदर्भातील माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी त्यांनी घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सह पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला पोलिसांना महिलेने गळफास घेतल्याची माहिती कॉलवर मिळाली होती.

Post a Comment

0 Comments