पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच! १३ दिवसांत ११ वेळा दर वाढले


 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. आज (रविवार) देखील हे दर ८० ते ८५ पैशांनी वाढले आहेत. आतापर्यंत १३ दिवसांत ११ वेळा इंधन दरवाढ झाली असुन ८ रुपयांनी दर वाढले आहेत.


भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीत इंधन दर ८० वाढले असून, पेट्रोल १०३.४१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९४.६७ रुपये प्रति लिटर झाले आहे. याचबरोबर मुंबईत ८४ पैशांची वाढ झाली असुन त्यानुसार पेट्रोल ११८.४१ रुपये आणि डिझेल १०२.६४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

याशिवाय चेन्नईमध्ये इंधन दरात ७५ पैशांची वाढ होऊन, पेट्रोल १०८.९६ रुपये आणि डिझेल ९९.०४ रुपये लिटर आहे. कोलाकातामध्ये पेट्रोल दरात ८४ पैशांची वाढ झाली असून पेट्रोल ११३.०३ रुपये लिटर पेट्रोल मिलथ आहे आणि डिझेलचे दर ८० पैशांनी वाढले असून डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर झाले आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या