नेवासा : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक म्हणून काम पहात असलेले राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काही ३ ते ४अज्ञात गुंडांनी नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे गोळीबार करून जीवघेणा हल्ला केला.
राजळे यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते.सदरची घटना शुक्रवारी रात्री ९.१५ ते ९.३० च्या सुमारास घडली.सद्या घोडेगाव येथे श्री घोडेश्वरी देवीचा यात्रा उत्सव सुरु आहे.यात्रेहुन लोहगाव येथे आपल्या घरी परतत असतांना आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी हा डाव साधला.त्यांच्यावर पाच फायर झाले त्यापैकी दोन गोळ्या त्यांना लागल्या.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी झालेल्या राहुल राजळे यांना तातडीने अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.यावेळी पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली होती.हल्लेखोरांचा पोलिस कसून शोध घेत आहे.सदरचे हल्लेखोर हे सराईत व परिसरातील असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान शुक्रवारी रात्री नामदार गडाख यांचे स्वीय सहायक म्हणून काम पहात असलेले राहुल राजळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या