पुण्याच्या MCA क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलचे क्रिकेट सामने खेळवले जात आहेत. गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटलचा सामाना शनिवारी खेळवला गेला. पिंपरीतील काही जणांनी सामन्यावर सट्टा खेळत असल्याचं पुढे आले असून त्यांच्याकडून २७ लाखांची रोकड आणि आठ मोबाईल गुंडा विरोधी पथकाने जप्त केले आहेत. ही कारवाई रात्री साडेसात वाजेच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सनी उर्फ भुपेंद्र चरणसिंग गिल, रिक्की राजेश खेमचंद, सुभाष रामकीसन अगरवाल अशी अटक केलेल्या आरोपींची नाव असून सनी सुखेजा याचा पोलीस शोध घेत आहेत. अशी माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी हजरतअली पठाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील वैभव पॅराडाईज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, हरीश माने आणि त्यांच्या पथकाने वैभव पॅराडाईज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतलं. ते सर्व क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा खेळत असल्याचं पुढे आले. त्यांच्याकडून २७ लाख रुपये रोख आणि आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पैकी सनी चरसिंग याने पोलिसांसोबत झटापट करून माझी वरपर्यंत ओळख आहे, तुम्हाला बघून घेऊन अशी धमकी दिली अस तक्रारीत म्हटलं आहे.
0 Comments