बीडमध्ये क्षुल्लक कारणावरून डॉक्टर दांम्पत्याला बेदम मारहाण; कायदा सूव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

 


बीड :
दिवसाढवळ्या बीडच्या गढी येथील खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टर पती-पत्नीवर गावगुंडांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात पतीला वाचवायला गेलेल्या महिला डॉक्टरला देखील मारहाण केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात नेमक काय सुरू असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात वाढते खून, दरोडा, मारामाऱ्या यामुळे पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आम्हाला न्याय द्या अशी मागणी पीडीत डॉक्टर दांम्पत्याने केली आहे. या घटनेबाबत सर्व डॉक्टर वर्गातून संताप व्यक्त केला जात असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली आहे.

असा घडला सर्व प्रकार...

गेवराई जवळ गढी येथे दवाखान्याच्या दारात उभी केलेली रिक्षा बाजूला घ्यायला सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून ओपीडी मध्ये येऊन डॉक्टर व डॉक्टरची पत्नी यांना मारहाण केली तसेच यावेळी महिला डॉक्टरचा विनयभंग केला. काहीच कारण नसताना आम्ही समजून सांगत असताना अचानक येऊन त्यांनी मारहाण केली माझ्या पत्नीला देखील त्यांनी मारहाण केली तसेच हाताने ओढणी ओढून विनयभंग केला. तसेच आता दवाखाना चालू देणार नाही अॅट्रोसिटी दाखल करू अशी धमकी देत आहेत, असं पीडित डॉ संभाजी पवार यांनी सांगितलं.

या प्रकरणी महीला डॉक्टरच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिसात तिघं आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात गोरख सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी व भाऊराव सूर्यवंशी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून तिघा पिता-पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेवराई चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी फोनवरून सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या