तुम्ही फक्त प्रॉपर्टी गोळा करणार काय?; मनसेचा रोख कोणाकडे?

 



मुंबईः
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मशिदींवरील भोंगा आणि हनुमान चालीसाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेनं ठाकरे सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरेंनी सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मनसेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही भोंग्यांवरुन महागाईबद्दल बोला, असा टोला लगावला होता. आता या टीकेला मनसेनंही उत्तर दिलं आहे.

मनसेनं घेतलेल्या या भूमिकेवरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी पलटवार केला आहे. तसंच, शिवसेनेनंही मनसेवर जोरदार टीका केली होती. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महापालिकेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला टोला लगावला आहे. आज सकाळीच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. तसंच, विरप्पन गँग म्हणत असा खोचक टोलाही शिवसेनेला लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात महागाईवर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, करोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेव्हा लोकांच्या समस्या पण राज ठाकरेंनीच सोडवायच्या, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसंच, राज ठाकरेंनीच समस्या सोडवायच्या आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार?, असा टोला संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसंच, विरप्पन गँग असा हॅशटॅगही दिला आहे.

आदित्य ठाकरेंनी मनसेला डिवचलं

मनसेने भोंगे लावल्यास त्यावरून देशातील वाढत्या महागाईबाबत जनतेला माहिती द्यावी. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि अन्य गोष्टींची दरवाढ कशामुळे झाली, हे मनसेने भोंग्यांवरून सांगावे. साठ वर्षांपूर्वीची इतिहास न उगाळता गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये काय झाले, हे सांगावे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या