पुणे महापालिकेकडून गुंठेवारी नियमितीकरणाला ३० जून पर्यंत मुदत वाढ

 


पुणे- 
शहरातील महापालिकेच्या हद्दीत अनेकांनी अनाधिकृतपणे पणे बांधकामे केली आहेत. बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या या बांधकामांसाठी गुंठेवारीतील घरे नियमितीकरणाला देण्यात आलेली मुदत संपली. १० जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेची मुदत 31  मार्चला संपली आहे. मात्र महापालिका प्रशासनाने या नियमितेकरणाला पुन्हा मुदत वाढ दिली आहे.आता 30 जूनपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. महापालिकेने या मोहिमेला आतापर्यंत केवळ 77 नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.


काय नियमितीकरण मोहीम

महापालिका हद्दीतील गुंठेवारी. त्यानंतर आता त असलेली अनाधिकृत घरे नियमित करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी १० जानेवारी ते 31 मार्चपर्यन्त प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दिली होती ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.  या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत फक्त 77  प्रस्ताव दाखल झाले आहेत. बांधकाम नियमावलीतील अटींमुळे छोट्या भुखंडांवर महापालिकेची परवानगी घेउन घरे बांधण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृतपणे ही बांधकामे केली आहेत. यापैकी जी घरे नियमान्वित होऊ शकतात, त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी कायद्यान्वये ती शुल्क आकारून अधिकृत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.



किचकट प्रक्रियेमुळे नागरिकांची पाठ

नियमितीकरणाची प्रक्रिया किलिष्ट आल्याने अनेक नागरिकांनी याकडे पाठ फिरवली आहे. अनाधिकृत बांधकाम अधिकृत करवून घेत असताना संबंधित नागरिकाला हा प्रस्ताव इंजिनिअरच्या माध्यमातून सादर करावे लागतात. मात्र यासाठी इंजिनिअर भरमसाठ फी आकारत असल्याने नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे आता महापालिकेने गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी आर्कीटेक्ट अथवा इंजिनिअरने 5 हजार रुपये फी आकारावी, असे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या