एका तासाच्या आत हरवलेली व्यक्ती सापडून दिली

 


नेवासा व प्रवरासंगम पोलिसांची कामगिरीने

नेवासा:  तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेल्या पुणे औंध परिवारातील हरवलेल्या ६५ वर्षीय इसमास एका तासाच्या आत शोध घेऊन सदरच्या व्यक्तीला कुटुंबाच्या हवाली करण्याची कामगिरी नेवासा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या प्रवरासंगम दुरक्षेत्रच्या पोलिसांनी केली.

याबाबत पोलीस दिलेली माहिती अशी की शुक्रवारी दि.१५ एप्रिल रोजी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी पुणे येथील औंध परिसरात राहणारे गाडे कुटुंब सहपरिवारासह वरखेड येथे आले होते.दर्शन झाल्यानंतर सदर कुटुंबातील ६५ वर्षीय व्यक्ती माऊली गाडे हे कुटुंबाना दिसेनासे झाले अनेक ठिकाणी शोध घेऊन ही गाडे परिवाराला कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती सापडली नाही.तेव्हा गाडे यांचे चिरंजीव मुकेश गाडे यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील इमर्जन्सी विभागाला कॉल केला

व सदरची व्यक्ती हरवल्याची माहिती दिली. त्यानंतर 

इमर्जन्सी विभागाने तातडीने नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिसिंग संदर्भात माहिती दिली.

क्षणाचाही विलंब न लावता पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी प्रवरासंगम पोलीस दुरक्षेत्राला सदरची माहिती वर्णन घेऊन कळविली व हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तातडीने आदेश दिले.दुरक्षेत्र विभागाचे हवालदार शैलेंद्र ससाणे व कॉन्स्टेबल अंबादास जाधव यांनी हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी वरखेडच्या दिशेने आपली पावले उचलली

दिलेल्या वर्णनानुसार सदरची व्यक्ती वरखेडहुन शिरसगावच्या दिशेने जात असतांना त्यांना आढळून आली.

यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अंबादास जाधव यांनी

भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून हरवलेली व्यक्ती शिरसगाव परिसरात सापडली असल्याची माहिती गाडे परिवाराला दिली.सदरची व्यक्तीला मोटारसायकल बसवून वरखेड येथे वाट पहात असलेल्या गाडे कुटुंबाच्या हवाली केले.यावेळी गाडे परिवारातील सदस्यांनी अवघ्या एक तासाच्या हालचालीनंतर माऊली गाडे यांचा तातडीने शोध घेतल्याबद्दल नेवासा पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह हवालदार शैलेंद्र ससाणे व कॉन्स्टेबल अंबादास जाधव यांना धन्यवाद देत पोलिसांनी केलेल्या कामगिरी बद्दल त्यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या