कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या कारचा अपघात

 कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कारचा अपघात झाला आहे. जालन्यात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास परतूरमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने अपघातातून इंदुरीकर महाराज बचावले आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. दरम्यान त्यांच्या गाडीचा चालक मात्र अपघातात जखमी झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महाराज गाडीने परतूर येथील खांडवी वाडी येथे जात होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांच्या स्कॉर्पिओ गाडीने ट्रॅक्टरला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचत मदत केली. सुदैवाने अपघातात इंदुरीकर महाराज जखमी झाले नाहीत. त्यांचा चालक मात्र किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या