ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीआधी अभिनेत्रीनं केला डान्स


टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलनं काही दिवसांपूर्वीच तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर बऱ्याच पोस्ट शेअर केल्या आहेत. ब्रेस्ट कॅन्सरबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्याचं काम ती आपल्या पोस्टमधून करताना दिसली. पण एवढ्या मोठ्या आजाराचा सामना करत असतानाही छवी नेहमीच सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं. सध्या सोशल मीडियावर छवीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती हॉस्पिटलमध्ये डान्स करताना दिसत आहे.

छवी मित्तलनं स्वतःच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चं गाणं वर धम्माल डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये छवीनं लिहिलं, ‘डॉक्टर म्हणाले छवी तुला चिल करायची गरज आहे. त्यामुळे मी चिल करत आहे.’ या पोस्टसोबत तिनं बरेच हॅशटॅग जोडले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये छवी डान्स करताना तिचा पती तिला हाक मारताना दिसत आहे. तो काहीतरी बोलतो आणि मग छवी डान्स करणं बंद करते आणि कॅमेरा त्याच्याकडे फिरवते. त्यानंतर तो देखील डान्स करताना दिसतो.

याशिवाय छवीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पेशंटच्या ड्रेसमध्ये बेडवर झोपलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ती हसत असून पतीचा हात पकडलेला दिसत आहे. सर्जरीच्या अगोदर तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाही. तिच्या या फोटोवर कमेंट करताना अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करून तिला हिंमत दिली आहे.

दरम्यान सर्जरीनंतर छवीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ६ तास चालली ही सर्जरी यशस्वी झाल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर करत छवीनं तिच्या आजारपणाबाबत माहिती दिली होती. यासोबतच तिने सर्व महिलांना दर ६ महिन्यांनी आपलं चेकअप करून घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे अशाप्रकारच्या आजारावर वेळीच उपचार होऊ शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या