अभयारण्य विभागाचं दुर्लक्ष; हजारो मोरांचा जीव धोक्यात


बीड
 : चा पारा 41 अंशा सेल्सिअसवर गेला आहे. उष्णतेने जिल्ह्यात कहर केला असून माणसांना बाहेर फिरणे अवघड झाले आहे. मग यात मुके प्राणी कसे अपवााद ठरतील, अशातच मयूर अभयरण्यात वनविभागाने पक्षांसह प्राण्यांसाठी तयार केलेले पाणवठे देखील कोरडेठाक पडले आहेत. यामुळे मोरांची पाण्यासाठी व्याकूळता मात्र वाढत चालली आहे. चारा- पाण्यासाठी या मोरांना वणवण भटकंती करावी लागतेय. अभयारण्यात जवळपास 9000 पेक्षाही जास्त मोर असल्याचं म्हटलं जात. पण या अभयारण्य विभागाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.बीडच्या पाटोदा तालुक्यातील बालाघाटाच्या डोंगर रांगेतील नायगावच्या मयूर अभयारण्यात मोरांसह इतरही जवळपास हजारो वेगवेगळ्या जातीचे पक्षी त्याचबरोबर हरीण, काळवीट, नीलगाय, खोकड यासह अन्य प्राणी देखील वास्तव्यास आहेत . 3 हजार हेक्टर या क्षेत्रफळांमध्ये मुक्या प्राण्यांसाठी जवळपास 28 पाणवठे बनवण्यात आले आहेत. पाणवठे कोरडे ठाक पडले असून वनविभागाकडून मोरांसह वन्य प्राण्यांच्या खेळ जिवाशी खेळ सुरू आहे. विशेष म्हणजे अभयारण्य क्षेत्रात मोरांच्या सुरक्षेसाठी उपाय योजनेकडे दुर्लक्ष होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या