राजस्थानच्या विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल


 मुंबई :
रविवारच्या दोन सामन्यांनंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले. आजच्या सामन्यांत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी बाजी मारली. त्यानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले, पाहा...

दोन सामन्यांनंतर गुणतालिकेत कोणते मोठे बदल झाले, पाहा...

आज रविवारी आयपीएलमध्ये दोन सामने झाले. आजच्या पहिल्या सामन्या दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला पराभूत केले. पण त्यामुळे गुणतालिकेत मोठा बदल झालेला पाहायला नाही. कारण या पराभवानंतरही केकेआरचा संघ हा ६ गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. केकेआरने सामान गमावला असला तरी त्यांचा रनरेट चांगला होता, त्यामुळे त्यांना गुणतालिकेतील अव्वल स्थान गमवावे नाही. दुसरीकडे मात्र लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एक संघ नक्कीच अव्वल स्थानावर जाणार असल्याचे स्पष्ट दिसत होते. कारण हा सामना सुरु होण्यापूर्वी लखनौचा संघ हा सहा गुणांसह चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे हा सामना जिंकून त्यांचे आठ गुण होणार होते आणि ते सहजपणे पहिल्या स्थानावर विराजमान होऊ शकले असते. कारण आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला आठ गुण कमावता आलेले नाहीत. त्यामुळे लखनौसाठी आजचा विजय अव्वल स्थानावर घेऊन जाऊ शकला असता. दुसरीकडे राजस्थानचा संघ हा गुणतालिकेत सामन्यापूर्वी ४ गुणांसह पाचव्या स्थानावर होता. पण त्यांचा रनरेट हा चांगला आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यावर त्यांचे ६ गुण झाले आणि त्यासह त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्याच्या घडीला राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल स्थावावर असून केकेआर दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेतील तिसरे स्थान यावेळी गुजरातचा संघ आहे, तर चौथे स्थान आरसीबीने पटकावले आहे. गुणतालिकेतील पाचव्या स्थानावर यावेळी लखनौ सुपर जायंट्सचा संघ आहे, तर सहावे स्थान दिल्ली आणि सातवे स्थान पंजाब किंग्सच्या संघाने पटकावले आहे. एका विजयासह सनरायझर्स हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे. सर्वाधिक आयपीएलचे जेतेपदं जिंकणाला मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी नवव्या आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ अखेरच्या म्हणजेच १०व्या स्थानावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या